कमल हासन यांची मुलगी – भाजपकडून कारवाईची मागणी
निवडणूक प्रचाराच्या दीर्घ काळानंतर मंगळवारी तामिळनाडूतील सर्व 234 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. मतदानासाठी अनेक कलाकारही मतदान केंद्रांवरील रांगांमध्ये दिसून आले. सुपरस्टार आणि मक्कल निधि मय्यमचे प्रमुख कमल हासन यांनी चेन्नईत मतदान केले आहे.
त्यांच्यासोबत दोन्ही मुली श्रूती आणि अक्षरा हासन देखील पोहोचल्या होत्या. पण भाजपने श्रूती हासन यांनी नियमांचा भंग केल्याचा आरोप करत तिच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.
कमल हासन यांनी चेन्नईत मतदान केल्यावर कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघात धाव घेतली. कमल हासन याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवार म्हणून मतदान केंद्रांवरील स्थिती जाणून घेण्यासाठी ते पोहोचले होते. पण या ठिकाणी श्रूती हासन देखील त्यांच्यासोबत गेल्या होत्या, हा नियमांचा भंग असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपचे कोइम्बतूर जिल्हाध्यक्ष नंदाकुमार यांनी भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख आणि कोइम्बतूर दक्षिणच्या उमेदवार वनाथी श्रीनिवासन यांच्या वतीने निवडण्tक आयोगात तक्रार नोंदविली आहे. श्रूतीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
काश्मिरात घाबरलो नाही, मग बंगालमध्ये कसे मागे हटू बिहारचे मंत्री शाहनवाज हुसैन यांचे विधान
पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान हिंसक घटना सुरूच आहेत. भाजप नेते आणि बिहारमधील मंत्री शाहनवाज हुसैन हे हावडा येथे एका प्रचारसभेला संबोधि करत असताना त्यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आमच्या सभेला मोठी गर्दी झाली होती, संबंधित भाग अल्पसंख्याकबहुल होता. माझ्यासाब्sात सीआरपीएफचे जवान होते, ते जर नसते तर काय घडले असते देवालाच माहित. आम्ही घाबरणार नाही, आम्ही काश्मीरमध्ये घाबरलो नाही, तर बंगालमध्ये कसे घाबरू असे उद्गार शाहनवाज यांनी काढले आहेत.
दगडफेक झाल्यावर पोलीस स्थानकात जात तक्रार नोंदविली आहे. आमच्या सभेत पोलिसांकडून कुठलीच सुरक्षा देण्यात आली नव्हती असा आरोपही त्यांनी केला आहे. हावडाच्या पिलखानामध्ये भाजप उमेदवार उमेश राय यांच्या प्रचारासाठी हुसैन पोहोचले होते. येथील सभेदरम्यान मुजफ्फर चौकात दगडफेक झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन टप्प्यांचे मतदान संपले असून अद्याप 5 टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. राज्यात पुढील टप्प्यासाठी 10 एप्रिल रोजी एकूण 44 जागांकरता मतदान होणार आहे.