वृत्तसंस्था /ग्लासगो
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांचा रोम दौरा संपवून ‘सीओपी26’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ग्लासगो येथे पोहोचले. ‘सीओपी26’ इन अ?Ÿक्शन अँड सॉलिडॅरिटी ः द क्रिटिकल डिकेड सेगमेंटमधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी हवामान बदलाबाबत भारताचा अजेंडा जगासमोर ठेवला. मागासलेल्या देशांना जागतिक मदतीची गरज आहे. त्यासाठी विकसित देशांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. जागतिक तापमानवाढीच्या मुद्यावर सर्व देशांनी एकत्र येऊन जनसहभाग अभियान राबविण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले. ‘सीओपी26’ या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी जगासमोर उभ्या ठाकलेल्या हवामान बदलाच्या संकटाबद्दल जलद पावले उचलण्याचे आवाहन सर्व देशांना केले.
भारतासह बहुतांश विकसनशील देशांतील शेतकऱयांसाठी हवामान बदल हे मोठे आव्हान आहे. पाऊस, पूर आणि संततधार वादळामुळे देशात पिके उद्ध्वस्त होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्राsतापासून ते परवडणाऱया घरापर्यंत, प्रत्येकाने हवामान बदलाविरुद्ध नियम लवचिक करणे आवश्यक आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर छोटय़ा देशांना मदतीची गरज आहे. भारतातील जल से नल प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला आहे. भारतात स्वच्छता मोहिमेमुळे लोकांचे जीवनमान सुधारले आहे, असे दाखले मोदींनी दिले.
भारतातील योजनांचा परामर्ष
भारतात, आम्ही अनेक समस्या आणि विकास कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक गरजा लक्षात घेऊन धोरणे आखली आहेत. नल से जल, स्वच्छ भारत मिशन आणि उज्ज्वला या माध्यमातून आम्ही लोकांचे जीवनमान सुधारले आहे. निसर्गासोबत राहण्याचे कसब येथील आदिवासींना अवगत आहे. त्यांचे हे कौशल्य पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी या जीवनाशी संबंधित विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक असल्याचेही मोदींनी सांगितले.
अमेरिका जगासमोर आदर्श ठेवेल ः बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या परिषदेत भाषण केले. आमच्याकडे गुंतवणूक करण्याची आणि स्वच्छ ऊर्जा भविष्य निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले. आपल्या पुढील पिढीसाठी स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि परिस्थितीनुरुप बदल निर्माण केले तर पुढील लढाई शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यादृष्टीने अमेरिका जगासमोर आदर्श ठेवेल आणि या मोहिमेचे ताकदीने नेतृत्व करेल. आमचे प्रशासन शब्दात नव्हे तर कृतीतून हवामान वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शिखर परिषदेपूर्वी मोदी-जॉन्सन भेट
‘सीओपी26’ वर्ल्ड लीडर्स समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मोदींनी जॉन्सन यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी हवामान बदल आणि अनुकूलनासाठी जॉन्सन यांच्या जागतिक पुढाकाराचे कौतुक केल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.
मागील सहा वर्षांमध्ये उच्चांकी उष्णता ः गुटेरेस
पॅरिस करारानंतर मागील 6 वर्षांमध्ये उच्चांकी उष्णता दिसून आली आहे. पारंपरिक इंधनाचा (जीवाश्म इंधन) वेगाने वापर करून आम्ही मानवतेला नाशाच्या वाटेवर ढकलत आहोत. मानवता वाचविण्यासाठी आम्हाला एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. एक तर आम्ही हे रोखू किंवा हवामान बदलामुळे आम्ही रोखले जाऊ असे उद्गार संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी काढले आहेत.
कॉन्फरन्स ऑफ पार्टीजचे 26 वे अधिवेशन 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. याचे अध्यक्षत्व ब्रिटन आणि इटली करत आहेत. यात उच्चस्तरीय म्हणजेच जागतिक नेत्यांची परिषद होणार असून यात 120 देशांचे प्रमुख सामील होतील. जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी कार्बन उत्सर्जन वेगाने रोखण्यासाठी करार करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम मागील काही वर्षांमध्ये जवळपास सर्वच देशांनी अनुभवले आहेत. यात महापूर, प्रचंड वणवे, दुष्काळ इत्यादी प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे.
या परिषदेत पंतप्रधान मोदी कोएलिशन फॉर डिझास्टर रेजिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर (सीडीआरआय) आणि इंटरनॅशनल सोशल अलायन्स अंतर्गत दोन नवे प्रकल्प सादर करणार आहेत. अर्थव्यवस्थेला शाश्वत पद्धतीने कशाप्रकारे पुन्हा रुळावर आणावे यावर परिषदेत भर दिला जाणार असून याकरता हवामान बदल रोखणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान बदल रोखण्यासाठीचा भारताचा रोडमॅप मोदींनी सादर केल्याचे समजते.
विकसित देशांची विशेष जबाबदारी
आम्ही हरित औद्योगिक क्रांती पाहत आहोत, पण आता जगभरात याची आवश्यकता आहे. विकसित देशांनी स्वतःची विशेष जबाबदारी ओळखून हरित औद्योगिक क्रांतीकरता प्रत्येकाला मदत करावी ग्लासगोमध्ये 250 वर्षांपूर्वी जेम्स वॅट एका अशा यंत्रासोबत आले होते, जे वाफेद्वारे संचालित व्हायचे. आम्ही तुम्हा सर्वांना त्याच ठिकाणी आणले आहे. 200 वर्षांपासून औद्योगिक राष्ट्र निर्माण होणाऱया समस्यांबाबत अनभिज्ञ असले तरीही आता जबाबदारी ओळखून पावले टाकण्याची वेळ आली आहे. हवामान बदल रोखण्यासाठीचा निधी वाढविण्याच गरज असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे.
जागतिक नेत्यांचा सहभाग
ग्लासगो येथील या हवामान बदल विषयक परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे युवराज चार्ल्स, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते दाखल झाले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे.