वार्ताहर / कास :
कास बामणोली परळी परिसरात गेल्या तिन दिवसांपासुन पावसाची मुसळधार सुरु असल्याने कास जुंगटी रोडवरील धावली फाट्याजवळ जुंगटी कडे जाणारा रस्ता खचल्याने जुंगटी जळकेवाडीकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असुन दळवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे
सातारा तालुक्यातील कास – जुंगटी रस्त्यावर २०१९ साली म्हणजेच दोन वर्षापुर्वी धावली फाट्याजवळ याच ठिकाणी रस्ता मधोमधच दिड ते दोन फुटानी खचला होता त्यावेळी वाहतुक काही दिवस ठप्प झाली होति संबधीत तलाठी ग्रामसेवक बांधकाम विभागाचे संबधीत आधिकारी यांनी वृत्तपत्रामध्ये बातमी छापुन येताच याठिकाणी येऊन खचलेल्या रसत्याची पाहणी करून पंचनामा केला होता मात्र शासनाने अदयाप कोणत्याही ऊपाययोजना केल्या नाहीत अखेर ग्रामस्थांनीच पाऊस ऊघडल्यावर दगड माचुन वाहतुक सुरु केली होती मात्र पुन्हा दोन वर्षानी याच ठिकाणी मोठया प्रमाणात रस्ता खचला असुन मॊठमोठया भेगा पडल्या आहेत रसत्याच्या कडेचा भागाची दरड कोसळली असुन रस्ता दोन फुटांनी खचला आहे तर पावसाची संततधार असीच सुरु राहील्याच रस्त्याचा खचलेला भागासह रस्ताच दोन दिवसात तुटुन जाणार असल्याची स्थिती निर्माप्ग झाली आहे जुंगटी जळकेवाडी कात्रेवाडी कारगाव पिसाडी आदीगावांसाठी हा एकमेव मार्ग वाहतुकीसाठी असल्याने नागरीकांची वाहतुक ठप्प झाली आहे या गावांचा दळवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे
गेल्या दोन वर्षापुर्वी याठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ता खचुन वाहतुक ठप्प झाली होती प्रशासनाने फक्त जागेवर हाजेरी लावत पंचनाम्याच सोपस्कार पार केले मात्र ऊपाययोजना काही न केल्या नाहीत त्यावेळी जर खालच्या बाजुने सरंक्षक भिंत बांधली असती तर आज रस्ताच तुटून गेला नसता वाहतुक ठप्प झाली नसती प्रशासन फक्त पुर्ण हानी झाल्यावर ऊपाययोजना करते का की काही प्राथमीक ऊपययोजना आहेत असा प्रश्न पडला आहे आता तरी प्रशासन जागे होणार का? नारायण कोकरे, जुंगटी ग्रामस्थ
धावली फाट्याजवळ रस्ता खचल्याने आमच्या संकटात भर पडली असुन कोणी आजारी पडल्यास दवाखान्यात न्यायचे कसे दररोज दुध घालण्यासाठी व बाजारपेठेत जाण्यासाठी पायपीट करायची किती खचलेल्या रस्ताच्या बाजुने तात्पुरता जेसीबी लाऊन ऊपाययोजना करून वाहतुक सुरू करावी व तात्काळ याठिकाणासह कास जुंगटी रस्ता दुरुस्तीसाठी घ्यावा अनेक ठिकाणी मोऱ्यांचे पाणी रोडवर येते तर रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. धुळाजी शिंदे, जळकेवाडी ग्रामस्थ