वाठार / प्रतिनिधी:
वाठार(कि.) ता. कोरेगाव येथे डिजीटल ग्रामपंचायत आणि हायमॉस्ट लॅम्पचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. वाठार येथील मुख्य चौकामध्ये तसेच बाजारपेठेच्या ठिकाणी दळणवळण जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत लोकांचा वावर असतो. यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग निधीतून डिजीटल ग्रामपंचायत आणि हायमास्ट लॅम्पची उभारणी करण्यात आली. यावेळी कोरोना संकट काळात ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या आशासेविका व अंगणवाडी सेविकांचा सत्कार पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच महाराष्ट्र सरकार राबवत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची माहिती नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर सर्वांनी करावा असे ते यावेळी म्हणाले. उपसरपंच पोपटराव गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला .तसेच सुत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले व आभार विश्वजित गायकवाड यांनी मानले.
याप्रसंगी कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागवत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब गायकवाड, सरपंच सौ.सविता गुजले, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग गायकवाड, किशोर गायकवाड, विकास सेवा.सोसायटीचे चेअरमन मोहन खिलारे, व्हा.चेअरमन कृष्णत गायकवाड, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, तुकाराम खामकर, गोरखनाथ गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, स्वाती गुरव , ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कोरेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ , प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिरुद्ध माने , सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.