प्रतिनिधी / सातारा
बसस्थानक परिसरात वाहतूक शाखा आणि अतिक्रमण विभागाने रस्त्यात बसणाऱ्या भाजी विक्री करणाऱ्यांवर केली कारवाई केली .सातारा बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय या दरम्यान कित्येकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. तरीही पुन्हा होते तसेच चित्र दिसते.अनलॉक झाल्याने पुन्हा अतिक्रमण गजबजु लागली आहेत. आज पहाटे बसस्थानक परिसरातील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सातारा पालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई करून रस्ता मोकळा केला.