सातत्याने आढावा बैठका घेवून देताहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचना
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात कोरोना वाढत चालला आहे. दररोजचा आकडा हा धक्कादायक ठरु पहात आहे. याच कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला ब्रेक लावण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांचे प्राधान्याने सातारा जिह्यावर मेहरनजर राहिली गेली आहे. जिह्यातील आरोग्य यंत्रणा कशी सक्षम करुन कोरोनाशी फाईट देता येईल याबाबत त्यांनी वारंवार जिह्यातील आरोग्य यंत्रणेशी बैठका घेवून सुचना दिलेल्या आहेत. जिह्यासाठी कोव्हॅक्सिन असेल वा कोव्हीशील्ड असेल या दोन्ही लसी कशा तातडीने पाठवून देता येतील याकडे प्राधान्य ते देतात. चांगले काम करणाऱया आरोग्य विभागाच्या पाठीवर कौतुकांची थाप देवून आणखी उत्साहाने त्याच दमाने काम करायला आरोग्य उपसंचालक डॉ. कदम हे भाग पाडत आहेत.
डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक म्हणून पदावर असल्याने सातारा जिह्यातील आरोग्य यंत्रणेला आणखी भक्कम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केलेले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामध्ये त्यांनी अधिक चांगले कसे काम जिह्याकरता होईल यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे सत्र सुरु ठेवले आहे. आढावा घेवून जिह्यात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी यंत्रणा कशी अधिक तत्परपणे काम करेल यासाठी त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. त्यांनी बधित रुग्णांचे कॉटक्ट ट्रेसिंग, टेस्टींग, पोर्टल डाटा एंट्री याबाबत आरोग्य केंद्र निहाय माहिती, कोव्हिड लसीकरण जिह्यात कुठेही कमी पडू नये म्हणून वारंवार जिह्यातील ज्या प्रमाणात मागणी होते. त्या प्रमाणात लस पाठवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असतात. त्यामुळे ज्या दिवशी तुटवडा जाणवतो त्याच्यानंतर लगेच लस देण्यासाठी आरोग्य उपसंचालकांच्याकडून पाठपुरावा असतो. प्राधान्य असते. तसेच जिह्यात वाढत चाललेला मृत्यूदर कमी करण्यासाठीही त्यांनी आरोग्य यंत्रणेला वारंवार सुचना केलेल्या आहेत. नव्याने मंगळवारी पुन्हा एकदा त्यांच्या पाठपुराव्यामुळे 50 हजार 700 एवढे लसीचे डोस पाठवून देण्यात आले.
आरोग्य उपसंचालक म्हणून डॉ. संजोग कदम यांनी जिह्यासाटी आणि जिह्यातील कोरोना बधित रुग्णांसाठी सकारात्मक पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे लसीकरण असेल वा साताऱयातील कंटेंटमेंट झोन, होम आयसोलेशनमधील रुग्णावर उपचार असतील, रुग्णांना बेड मिळावा, रेमडेसीवर मिळावे, ऑक्सिनजनची कमतरता भासू नये आदी बाबींकरता त्यांच्या वारंवार जिह्यातील आरोग्य यंत्रणेला सुचना असतात. त्यामुळे जिह्याकरता आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांची विशेष मेहेरनजर असल्याचे दिसून येत आहे.