घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागते. घरगुती सिलिंडर गळतीमुळे होणारे अपघात टाळणे शक्मय आहे. किचन हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. गृहिणींकडून गॅस वापराची नियमित दक्षता आणि काळजी घेतल्यास अपघातांपासून बचाव होऊ शकतो.
गॅस गळती झाल्यास…
काही वेळेस गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्मया उघडय़ा ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. सिलिंडरवरील रेग्युलेटर काढून नॉबवर त्याची प्लास्टिकची कॅप लावून वितरकाला संपर्क करा. काडेपेटी किंवा मेणबत्ती चुकूनही पेटवू नका. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा. सिलिंडर व गॅस शेगडीच्या सान्निध्यात इलेक्ट्रिक शेगडी, रॉकेल स्टोव्ह, कोळसा शेगडी अशा इतर उपकरणांचा वापर करू नये. पाच वर्षे गॅरंटीसह ट्रिपल कोटिंग असलेली, दीर्घकाळ टिकणारी आयएसआय मार्कची सुरक्षा पाइपच वापरा. या पाईप उंदरांचा उपद्रव, उष्णता, पाणी व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही.
रेग्युलेटर बंद करा
काम संपल्यानंतर कॉक आणि रेग्युलेटर बंद करून ठेवा. टी जॉइंट करून रेग्युलेटरवर एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर प्रतिबंधक आहे. शेगडी सिलिंडरच्या जास्त जवळ ठेवू नये. जमिनीपासून साधारण उंचीवर ठेवून स्वयंपाक करावा.
सुती कपडे वापरा
स्वयंपाकघरात काम करीत असताना अंगावर नेहमी सुती वस्त्र वापरावे. गॅस सिलिंडर नेहमी उभे ठेवावे. गॅस संपत आला म्हणजे सिलिंडर आडवे किंवा उलटे करू नका. सिलिंडर व गॅस उपकरणास लहान मुले हात लावणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
एलपीजी जोडताना
जेथे एलपीजी ठेवायचा आहे ती जागा हवेशीर असावी. तिला समोरासमोर वायुविजन होईल अशी रचना असावी. दारे-खिडक्मया बंद असणाऱया खोलीत कधीही एलपीजी वापरू नये. सिलिंडर, रेग्युलेटरचे बटन आणि रबरी पाइप हात पोहोचेल, अशा पद्धतीने ठेवावी.
? सिलिंडरचा वापर नेहमी जमिनीवरच करा. तळघरात, जमिनीखाली एलपीजी वापरू नये. शेगडी जमिनीवर ठेवू नये. ती नेहमी टेबलावर किंवा ओटय़ावर (उभे राहून जेवण बनविता येईल अशा पद्धतीने) ठेवावी.
? एका खोलीत दोनपेक्षा जास्त सिलिंडर ठेवू नयेत. सिलिंडर नेहमी उभ्या स्थितीत ठेवावा. ते आडव्या किंवा इतर दुसऱया स्थितीत ठेवल्यास त्याच्यातील द्रवरूप एलपीजी उघडय़ा व्हॉल्व्हमधून बाहेर येईल आणि घातक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
? गॅस उपकरणांच्या अवतीभवती एक मीटरच्या अंतरामध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, केरोसीन स्टोव्ह असे कोणतेही उष्णता निर्माण करणारी साधने ठेवू नयेत. सिलिंडरला थेट ऊन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये. सिलिंडरवर कोणतेही भांडे, कापड, आदी ठेवू नयेत. रिकामे किंवा भरलेले सिलिंडर सुरक्षाकॅप लावल्याशिवाय ठेवू नका.
भरलेले सिलिंडर जोडताना
सुरक्षाकॅप काढण्यासाठी तिला खाली दाबा, तिची दोरी खेचा आणि दोरी खेचलेल्या अवस्थेत असतानाच सिलिंडरची कॅप उचला. सिलिंडरच्या आत सिलिंग रिंग असल्याची खात्री करा. रिंग नसेल तर सिलिंडर न वापरता सुरक्षा कॅप पुन्हा लावून ठेवा. गॅस वितरकांशी संपर्क साधून सिलिंडर बदलून घ्या.
कशी घ्याल काळजी?
? गॅस सिलिंडर आणि गॅसची पाइप यांची नियमित तपासणी करा.
? कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱयांकडून तपासणी करून घ्या.
? चांगल्या दर्जाची पाईप वापरा.
? स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.
? गॅसगळती झाल्यास दारे-खिडक्मया उघडा.
? टय़ूब, लाइट सुरू करू नका.
? गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, लायटर, सिगारेट लायटर वापरू नका.
? मेणबत्ती किंवा देवाजवळील दिवा तेवत असेल तर तत्काळ विझवा.
? रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.
? गॅस कंपनीच्या माणसाला तत्काळ फोन करा.