आज 205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 27, 803 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
4471व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 205 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 139 पुरुष, 66 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 763 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 27 हजार 803 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2305 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2100 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 205 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 763 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 22 हजार 569 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट – 1050, मंगळवेढा- 1296, बार्शी-5068, माढा-2872, माळशिरस –4704, मोहोळ -1218, उत्तर सोलापूर – 705, करमाळा- 1983, सांगोला 2159, पंढरपूर 5456, दक्षिण सोलापूर –1292, एकूण – 27, 803
होम क्वांरटाईन – 3225
एकूण तपासणी व्यक्ती- 210254
प्राप्त अहवाल- 210204
प्रलंबित अहवाल- 51
एकूण निगेटिव्ह – 182401
कोरोनाबाधितांची संख्या- 27,803
रुग्णालयात दाखल – 4471
आतापर्यंत बरे – 22,569
मृत – 763