जम्मू
जम्मूमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान दगडफेक आणि हिंसा केल्याच्या आरोपाखाली 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जम्मूमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू होताच संबंधित भागातील लोकांनी रस्त्यावरील वाहतूक रोखत पथकावर दगडफेक केली होती. यामुळे मोहिमेला रोखावे लागले होते. प्रशासनाने या घटनेच्या विरोधात कारवाई करत मोहिमेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.