कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचा दणका
प्रतिनिधी / कोल्हापूर
खत विक्री करणाऱया जिल्हÎातील 40 केंद्राव धाडी टाकून गैरप्रकार आढळून आल्याने कारवाई करण्यात आली असून यातील 30 केंद्रांना खत विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तर दहा केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
यंदाच्या हंगामात युरीयाला चांगली मागणी होती. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करुन काही खत विक्री केंद्र चालक जादा दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने मोहीम सुरु केली होती. ज्या कृषी केंद्रातून एकाच शेतकऱयाला जादा वेळा खत विक्री झाली आहे. अशा शेतकऱयांची शोध मोहीम घेण्यात आली. जिल्हÎात एकुण 1590 कृषी केंद्रे आहेत. त्यापैकी 46 केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे समोर आले. यातील 30 केंद्रावर थेट कारवाई करण्यात आली.
क्युआर कोड नसेल तर परवाने रद्द खत विक्रीत गैरप्रकार होणार नाहीत यावर लक्ष ठेवून आहोत. 6 डिसेंबर पर्यंत तपासणी मोहीम राबवून कारवाई