देशात गेल्या 24 तासात 43 हजार 733 नवे रुग्ण – 930 बाधितांचा मृत्यू – एकूण लसीकरण 36 कोटींजवळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱया लाटेचा संसर्ग घटताना दिसून येत असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. परंतु, बुधवारी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी दिवसभरात 43 हजार 733 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तसेच याचदरम्यान 930 बाधितांचा मृत्यू झाला असून 47 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.18 टक्क्मयांवर पोहोचला आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात 35 कोटी 96 लाख 18 हजार 603 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तसेच मंगळवारी एका दिवसात 32 लाख 35 हजार 914 जणांनी कोरोनाची लस घेतली.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी कोरोनामुळे 930 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत एकंदर 4 लाख 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 कोटी 6 लाख 63 हजार 665 जणांना बाधा झाली आहे. एकंदर रुग्णांपैकी 2 कोटी 97 लाख 99 हजार 534 जणांनी कोरोनावर मात केली आहे.