- सलग दुसऱ्या दिवशी 4 हजार पेक्षा अधिक मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यात काल भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा विस्फोट झालेला झाला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज वाढत असलेली रुग्ण वाढ आणि मृतांची संख्येने दहशत निर्माण केली आहे. मागील 24 तासात देशात 3 लाख 62 हजार 727 नवे रुग्ण आढळून आले. तर 4,120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी देशात 3 लाख 52 हजार 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटी 37 लाख 03 हजार 665 वर पोहचली असून, मृतांची संख्या 2 लाख 58 हजार 317 एवढी आहे. तर आतापर्यंत 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 जणांना लस देण्यात आली आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
- 37.10 लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण
सध्या देशात 37 लाख 10 हजार 525 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 97 लाख 34 हजार 823 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 30 कोटी 94 लाख 48 हजार 585 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 64 हजार 594 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 12 मे 2021) एका दिवसात करण्यात आल्या.