प्रतिनिधी/ सातारा
शहराला पाणी पुरवठा करणाऱया शहापूर उपसा योजनेला सातत्याने काही ना काही बिघाड होत असतो. परंतु शिवजयंतीच्या सकाळीच पॉवर हाऊस रोडवर कास मार्गे येणाऱया जलवाहिनीला गळती लागल्याचे पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्या निशर्दनास येताच त्यांनी लगेच दुरुस्तीचे काम करुन घेतले.
कास जलवाहिनीला शक्यतो गळती लागत नाही. बंदीस्त पाट केल्याने पावसाचे पाणी ज्यादा आले तर गळती लागते. ती गळती लगेच काढण्यात पालिकेला यश येते. मात्र, शिवजयंतीच्या सकाळीच कासच्या जलवाहिनीचा पॉवर हाऊसजवळील व्हॉल्व्हला गळती लागली होती. गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. काही नागरिकांनी याची माहिती पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांना दिली. सभापती सीता हादगे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या पथकास सुचना देत व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या सुचना दिल्या. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांनी हे काम करुन घेतल्याने गळतीची समस्या सुटली आहे.