धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी कार्यक्रम.
डिचोली : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी (फाल्गुन अमावास्या) मंगळवार दि. 21 मार्च रोजी धर्मवीर ज्वालेचे डिचोली येथे सकाळी 11 वाजता आगमन होणार असल्याची माहिती ह. भ. प. किरण बुवा तुळपुळे यांनी दिली. अत्यंत तेजस्वी आणि धर्मासाठी बलीदान केलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींचे तेज या ज्वालेत आहे. त्याचे दर्शन सर्वांनी घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डिचोली जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी 11 वाजता कार्यक्रम होणार असून सर्वांना प्रेरणा देणाऱ्या या ज्वालेचे दर्शन घेऊन प्रत्येकाने राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी कार्यरत राहावे असे किरण बुवा तुळपुळे यांनी सांगितले. या वेळी वासुदेव नाईक, संजय नाईक, शिवदास नाईक, तुळशीदास पळ, अऊण मांद्रेकर, मंदार गावडे, पापुराज मयेकर आदि?ची उपस्थिती होती.