प्रतिनिधी,कोल्हापूर
बुधवारी गुढी पाडवा झाला. या एक दिवशीच सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पाडव्यानंतर सोने व चांदीच्या दरात घसरण वा स्थिरता येईल अशी सराफ व्यावसायिकांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा भंग झाली असून, सोने व चांदीच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
सोन्याच्या दराची झळाळी वाढत असतानाच, दुसरीकडे शेअर बाजार घसरणीला लागला आहे. भविष्यात सोन्याचा दर उच्चांकी राहणार असल्याचा संकेत असल्याने, गुंतवणूकदार आता सोन्याच्या गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. गुढी पाडव्यानंतर दर कमी होण्यापेक्षा उलट दरवाढ होऊ लागली आहे.
अमेरिकन बँका बंद पडू लागल्याने, जागतिक अर्थंव्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. वितिय संस्था कोलमडू लागल्याने, शेअर बाजारालाही घसरण लागली आहे. नऊ मार्चला सोने दर 10 ग्रँमला 56600 तर चांदी किलोला 63300 रुपये असा दर होता. 20 मार्च रोजी हाच दर वाढून होता. सोने 61 हजार तर चांदी 70 हजार रुपये असा झाला होता. पण गुढीपाडव्या दिवशी हाच दर घसरला. सोने 60 हजार तर चांदी 69500 असा होता. यानंतर सोने व चांदीची घसरण न होता दर वाढतच चालला आहे. गुरुवारी सोने 60400 तर चांदी 70700. शुक्रवारी 24 रोजी दरामध्ये आणखी वाढ झाली. सोने 61200 तर चांदी 72 हजार रुपये झाली आहे. शनिवारी सराफ बाजाराला सुट्टी असल्याने, दर आहे तोच होता.
मोठ्या बँका बुडू लागल्याने शेअर बाजार घसरणीला लागल्याने, गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढू लागला आहे. भविष्यात दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 70 हजारच्या पुढे जाण्याचे संकेत असल्याने, गुंतवणूकदार आता सोन्याकडे वळू लागले आहेत.
Previous Articleखंडपीठप्रश्नी 10 दिवसांत मुख्यमंत्र्यासमवेत बैठक
Next Article कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल ॲकॅडमीसाठी प्रयत्न
Related Posts
Add A Comment