नोव्हेंबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1 दु 12.20 नं, 2, 5,6, 10, 12,13,14,15 सायं 5 नं, 17, 19 स. 10.40 नं, 20,21,24,25,26,27 सायं 4.30 नं, 28 स 10.30 नं,29
2 अशुभ दिवस 4,5,8,9,11,16,18,22,23,30
3 अनिष्ट दिवस 1,3,4,8,11, 15, 16, 17, 18,19, 22,23, 28,29,30
4 सण/ उत्सव/ विशेष तिथी 1- दुर्गाष्टमी, 2- कुष्मांड नवमी, 4-प्रबोधिनी एकादशी, 5-तुलसी विवाह प्रारंभ, चतुर्मास समाप्ती, शनी प्रदोष, 7- त्रिपुरारी पौर्णिमा, 8 कार्तिक स्नान समाप्ती, गुरु नानक जयंती, खग्रास चंदग्रहण, तुलसी विवाह समाप्ती, 9-ग्रहण करी दिन, 12-संकष्टी चतुर्थी, 16-काल भैरव जयंती, 20 उत्पत्ती एकादशी, 21- सोम प्रदोष, 22- शिवरात्री, 23 दर्श अमावास्या, 24- देव दिवाळी, मार्तंड (मल्हारी खंडोबा) षड्रात्रोत्सव प्रारंभ, 27- विनायक चतुर्थी, 29-चंपाष÷ाr, स्कंध ष÷ाr, 30-बुधाष्टमी
5 अमावास्या 23 दर्श अमावास्या स. 6.54 ते उत्तर रात्री 4.27 प.
6 पौर्णिमा 7- त्रिपुरारी पौर्णिमा दु 4.16 ते 8//11/22 दु 4.32 प
7 साखरपुडय़ाचे मुहूर्त 6,7 दु 4 प, 10,19 स 10.45 नं, 20 स 11.40 प, 21,24,25 सायं 5.30 नं, 26 दु 3 प, 27 दु 4.30 नं,
8 बारसे (नाव ठेवण्याचे) मुहूर्त 6,7 दु 4 प, 10, 13 स 10.30 नं, 14, 24 सायं 7.30 प,
10 जावळाचे मुहूर्त 6, 7 दु 12.40 प, 13 स 10.30 ते 12.00, 20 स 10.30 प, 21 स 10 प
11 भूमिपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त 7 दु 4 प, 10, 13 स 10 प, 14 दु 1.30 नं.
12 पाया खणणे मुहूर्त 17 सकाळी 8 पर्यंत
13 गृहप्रवेशाचे मुहर्त (व्यावहारिक मुहूर्त) 5, 6, 10, 13 10 नं, 26, 27 दु 4 नं.
14 ग्रह पालट रवी 16/11/2022 वृश्चिक, मंगळ 13/11/22 वृषभ, बुध 13/11/22 वृश्चिक शुक्र 11 वृ
15 व्यापार सुरु करण्याचे मुहूर्त 6, 7 दु 4 प, 10, 14 दु 1.30 नं, 19 10.40 नं, 24 सायं 7.30 प
16 वाहन खरेदीचे मुहूर्त 10, 13 स 10.30 नं, 14, 24, 25 सायं 5 प.
17 दागिने खरेदीचे मुहूर्त 14 दु 1.15 ते 15/11/22 4.13 प
18 इस्लाम धर्मातील सण 6 – फ़तेह याजदम ग्यारह शऱीफ
19 विशेष योग रवीयोग 3 ते 8, 14,15, 26 ते 29,सर्वार्थ सिद्धी योग 14 ते 16, 18 ते 21, 23,24, 27 ते 29अमृतसिद्धी योग 20,21,23,24 द्वीपुष्कर योग 29,30
20 पंचक 2/11/22 दु 2.18 ते 5/11/22 रात्री 11.57 पर्यंत, 29/11/22 ते 03/12/22 सकाळी 5.46 पर्यंत
नोव्हेंबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
विशेष सूचना– वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळय़ा पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेले आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत असे माझे मत आहे.
मेष
येणाऱया काळामध्ये रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वाद-विवाद होऊ शकतात आणि ते कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात दोन्हीकडे प्रभावित करू शकतात. ज्या गोष्टींबद्दल तुमच्या अपेक्षा आहेत त्या उशिरा घडू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद कटाक्षाने टाळावेत. वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. भावंडांच्या दृष्टीनेसुद्धा थोडे त्रासदायक ठरेल.
उपायः गणेश आराधना करावी.
वृषभ
कामाच्या ठिकाणी अधिकार प्राप्तीचे योग बनत आहेत. नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. धनप्राप्ती चांगली असेल. जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांना अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांना धनप्राप्तीचे योग आहेत. मात्र या काळामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. कामानिमित्त स्थान परिवर्तन घडू शकते. वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्याने वागून एकमेकाला सहयोग करण्याची गरज आहे.
उपाय ः देवीची उपासना करावी
मिथुन
निर्णय घेताना चुका होऊ शकतात त्यामुळे जाणकार व्यक्तीशी चर्चा करून किंवा चार चौघांना विचारून मगच निर्णय घ्यावे. या काळात डोक्मयाला छोटा मोठा मार लागू शकतो याकरता वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. आर्थिक बाजू चांगली असेल. जे लोक नोकरीकरता प्रयत्न करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिकांना लाभाचे योग होत आहेत. पण कोणत्याही बाबतीत घिसाडघाई करून चालणार नाही.
उपायः श्रीविष्णूची उपासना करावी
कर्क
व्यापाराशी संबंधित जे लोक आहेत त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे फक्त प्रयत्न वाढवावे लागतील. या काळात प्रवास घडू शकतो आणि एखाद्या कामाला पुनः पुन्हा करावे लागू शकते. चांगल्या संधी तुमची वाट बघत आहेत त्याचा फायदा उचलावा. तब्येतीची चिंता मिटेल. धनप्राप्ती चांगली असेल. हा काळ मातृ चिंतेचा आहे. जमिनीचे व्यवहार महिनाभर टाळावे.
उपाय – शंकराची उपासना करावी
सिंह
तब्येत उत्तम असेल. या काळात कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्ग आणि सहयोगी तुमच्यावर खुश असतील. करिअरच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. या संधींचा तुम्ही कसा फायदा उचलतात यावर आर्थिक लाभ अवलंबून असेल. घरातील वातावरण काही अंशी सुधारण्याची शक्मयता आहे. महिनाभर प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. गुप्त शत्रू मात्र काही दृष्टीने त्रास देण्याचा प्रयत्न करतील.
उपाय – सूर्याची उपासना करावी
कन्या
या काळात म्हणजे साधारण महिन्याभरात तुमचे अडकलेले पैसे वसूल करण्याचे सगळे प्रयत्न करा, सफलता मिळू शकते. व्यापार धंदा करणाऱया लोकांसाठी येणारा काळ हा चांगला पैसा मिळवून देईल. ग्रह योगामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. प्रवास करत असताना सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय श्रीविष्णूची उपासना करावी
तूळ
संमिश्र प्रकारचे ग्रहमान आहे. काही बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. खास करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक चिंता किंवा अतिरिक्त ताण तणावापासून दूर राहा नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये इन्क्रिमेंट किंवा बोनस मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये थोडा कलर अनुभवायला येऊ शकतो. पैशांच्या दृष्टीने समाधानकारक काळ आहे. जमिनीचे व्यवहार फलदायी ठरतील. गुंतवणुकीतून फायदा होईल.
उपाय महालक्ष्मीची उपासना करावी
वृश्चिक
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. पूर्वी एखाद्या तब्येतीच्या तक्रारी मुळे त्रस्त झाला असाल तर त्यावर उपाय सापडेल. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कामे करत असताना सावध राहा. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. वाहन सुख उत्तम असेल. प्रेम प्रसंगात ताणतणाव निर्माण होईल. नोकरदार वर्गाने सावध राहणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात कटू प्रसंग येऊ शकतात.
उपाय – कार्तिकेयाची उपासना करा
धनु
आरोग्याचा पाया तितकासा मजबूत नाही आहे त्यामुळे कुपथ्य करणे टाळावे. अडकलेले पैसे परत मिळतील पण त्यात थोडा मनस्ताप संभवतो. आर्थिक बाजू चांगली असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. उत्तरेकडचा प्रवास लाभदायक ठरू शकेल. स्थावर मालमत्ता किंवा वाहन संबंधित व्यवहार तुर्तास टाळावे. धोकादायक गुंतवणुकीतून नुकसान संभवते. जोडीदार यामुळे फायदा होईल. उपाय दत्त भक्ती करावी
मकर
आरोग्याची उत्तम साथ मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. तुमच्यामुळे लोकांचा फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींना आता वेळ काढावा लागेल. घरात एखादे छोटे फंक्शन होऊ शकते. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. घरच्या कामांवरती खर्च होईल. वाहन दुरुस्ती येऊ शकते. प्रेम प्रसंगांमध्ये समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक सध्या टाळा. नोकरदार वर्गाला चांगले ग्रहयोग आहेत. नोकरीत सहकार मुळे त्रास संभवतो.
उपाय – शनि उपासना करावी
कुंभ
समाजामध्ये मानसन्मान वाढण्याची शक्मयता आहे. जुने मित्र भेटतील. मंगल कार्य निमित्त खर्च होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटाल. नोकरदार वर्गाला वरि÷ांकडून शाबासकी मिळेल. गुप्त शत्रूंचा कारस्थानात वाढ होण्याची शक्मयता आहे. छोटय़ा गुंतवणुकी मधून लाभ मिळाल्याने खुश व्हाल. बऱयाच काळा पासून रखडलेले एखादे काम पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये थोडे वाद-विवाद संभवतात. मनातील हेतू प्रकट करू नका.
उपाय – शिव उपासना करावी
मीन
घर ,वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी घेण्याचा विचार असेल तर अनुकूल काळ आहे. या काळामध्ये नोकरदार वर्गाने आपल्या बरोबर काम करणाऱया लोकांवरती अति विश्वास ठेवू नये. व्यावसायिक लोकांना व्यवसायामध्ये नफा होण्याची शक्मयता जास्त आहे. तब्येतीच्या बाबतीत मात्र काळजीपूर्वक राहिलेले बरे. कुटुंबात एखाद्या व्यक्तीमुळे वाद संभवतो. प्रवास शक्मयतो टाळा. गुंतवणूक करत असताना सावध रहा. प्रेम प्रसंगात यश मिळेल.
उपाय हनुमानाची उपासना करावी