मेषः वडिलार्जित ईस्टेटीचे प्रश्न सोडविण्यास उत्तम.व्यवहारचातुर्य ठेवा.
वृषभः सूडबुद्धी आणि कपटकारस्थान यापासून सावध राहावे लागेल.
मिथुनः शत्रूंचा त्रास कमी होईल, पैसा भरपूर मिळेल पण खर्चही वाढतील.
कर्कः अनेक मार्गाने आर्थिक लाभ, वाहन सौख्य, विवाह कार्यात यश.
सिंहः राजकारणात स्वतःच्या कर्तबगारीला वाव मिळेल.
कन्याः अंधश्रद्धेच्या मागे लागून भोंदू व्यक्तीकडून आर्थिक फसवणूक.
तुळः अध्यात्मिक प्रगती उत्तम. पण विचित्र मार्गाने धनलाभ.
वृश्चिकः ओळखीचा गैरफायदा घेतला जाईल. महिला वर्गाने संभाळावे.
धनुः शत्रूच्या कारवाया त्यांच्यावरच उलटतील. आर्थिक व्यवहारात यश.
मकरः खेळ व इतरत्र लक्ष दिल्यामुळे शैक्षणिक नुकसान, वेळीच सावध व्हा.
कुंभः गैरसमजामुळे माता-पित्याशी मतभेद. समझोत्याने गेल्यास फायदा.
मीनः धनलाभ, मित्रांचे सहकार्य व अडलेल्या कामात यश.