विजया ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा केअर सेंटरचे सहकार्य
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी कक्षाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. विजया ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा केअर सेंटर यांच्या सहकार्याने हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. जगदगुरु डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
विमानतळावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. कोरोनामुळे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असल्याने वैद्यकीय तपासणी कक्षाची गरज भासत होती. विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी पाटील यांच्या सहकार्याने हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची आरोग्य तपासणी करणे सोयीचे होणार आहे. बुधवारी सकाळी या कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कारंजी मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, हुक्केरी येथील चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, विजया ऑर्थोचे डॉ. रवी पाटील, ज्ये÷ वकील बसवराज रोट्टी, प्रताप देसाई आदी उपस्थित होते.