प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्यातील उगे येथे सोशिएदाद संस्थेची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. त्यापैकी 35 लाख चौरस मीटर जमीन सरकारच्या नावावर झाली असून, त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर प्रकाश टाकला होता. सदरची जमीन सरकारी मालकीची बनल्याने आम्हची राहती घरे, उत्पनाखाली आणलेल्या जमिनीचे पुढे काय? असा प्रश्न गावकर्यांपुढे निर्माण झाला आहे. याबद्दल लोकांत कमालीची भिती असून. एकूणच लोक संभ्रमावस्थेत आहे.
हा प्रश्न उगेवासियांनी आमदार प्रसाद गावकर यांच्यासमोर मांडला असून येत्या सोमवार दि. 16 रोजी उपजिल्हाधिकार्यासमवेत ग्रामस्थाची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यामंत्र्यांनी उगे येथे 35 लाख जमीन सरकारच्या नावावर केल्याचे सांगितले होते. तसेच सरकारी जमीन कुणालाहि हडप करू देणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार ग्रामस्थानी एक -चोदा उतारा काडून पाfहल्यावर इतर हक्कदारात सरकारचे नावं असल्याचे दिसून आले आहे. तसेच सोशिएदाद संस्थेचे नावं गायब झाले आहे असे गावकर्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांत खळबळ माजली आहे.
मुळात सोशिएदाद संस्थेने अनेक लोकांना घर तसेच शेती, बागायत करण्यासाठी पैसे घेऊन लीज पद्धतीवर जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे आत्ता आमचे काय होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोर्तुगीज काळापासून हि जमीन सोशिएदाद संस्थेकडे होती. त्या संस्थेने लोकांकडून पैसे घेऊन जमिनी लीजवर दिल्या आहेत. आत्ता सरकारला जाग आल्याने सरकारने आपले नावं 1/14 उतार्यावर घातले आहे.
माजी सरपंच संजय शिरोडकर आणि पंच मारकूस परेरा यांनी याविषयावर ग्रामस्थाची उगे येथे नुकतीच बैठक बोलविली होती. यावेळी आमदार गावकर तसेच नागाfरक हजर होते. यावेळी आमदार गावकर यांनी सांगितले की उगेत 35 लाख चौ. मीटर सरकारी जमीन असल्याचे मुख्यामंत्यांनी विधानसभा अधिवेशनात सांगितले आहे. मात्र यासंदर्भात आपल्याला अन्य कोणतीहि अधिक माहिती नाहि. त्यासाठी दि. 16 रोजी जिल्हाधिकारी आणि ग्रामस्थची संयुक्त बैठक बोलविली असून तो पर्यंत शांत रहा असे ग्रामस्थाना सांगितले. समजा ग्रामस्थावर अन्याय होत असल्यास आपण तुमच्या बाजूने उभा राहिल असे त्यांनी स्पस्ट केले. संजय परवार यांनी ज्या लोकांची घरे आहेत, जमीन उत्पvनाखाली आणलेली आहे. ज्यांच्याकडे लिज आहे, त्यांना त्या सरकारने ध्याव्यात अशी मागणी केली आहे.
अजूनहि 37 लाख चौ. मीटर सोशिएदाद संस्थेची जमीन सरकारच्या नावावर होणे बाकी आहे अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान सदरची जमीन सरकारच्या नावावर झाल्याचे कळताच लोकांकडून कुंपण घालून जमीन बळकवण्याचे प्रकार सुरु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याकरता महसूल खाते सतर्क होण्याची गरज व्यक्त होत आहे.