ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजार पार झाला आहे. शुक्रवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2725 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये चमोली मध्ये 2, चंपावत 1, देहरादूनमध्ये 3, नैनिताल 14, ऊधमिसिंह नगर 13 आणि अन्य एकाचा सहभाग आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण रुग्णांपैकी 1822 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 848 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.