नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपनी एनटीपीसीने मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीत 4 हजार 649 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून मागच्या वर्षाच्या समान कालावधीशी तुलना करता हा नफा तीनपट अधिक असल्याचे समजते. मागच्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीने 1 हजार 629 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीने सदरच्या कालावधीत यावर्षी 31 हजार 687 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त करण्यात यश मिळवलं आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 31 हजार 330 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 14 हजार 969 कोटी रुपये इतका नोंदला गेला जो आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 11 हजार 191 कोटी रुपये इतका होता.