नवी दिल्ली
ओला स्कूटरबाबत बाजारात चर्चा रंगलेली असतानाच आता ही गाडी प्रत्यक्षात चालवण्याचा अनुभव घेता येणार आहे. कारण बुधवार 15 डिसेंबरपासून ओलाच्या स्कूटर्सची डिलिव्हरी सुरू होणार आहे. ज्यांनी गाडी बुक केली होती त्यांना आता गाडी लवकरच डिलिव्हरी केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ज्या लोकांनी ओला एस 1, ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर ऍडव्हान्स बुकिंग केली होती त्यांना 15 डिसेंबरपासून स्कूटरची पोहच केली जाणार आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, ओलाने स्कूटरच्या डिलिव्हरीला सुरूवात करण्यात येत असून कंपनी थेट ग्राहकापर्यंत गाडी पोहचवणार आहे. डायरेक्ट-टू-कस्टमर सेल मॉडेलच्या माध्यमातून कंपनी स्कूटर्सची डिलिव्हरी हाती घेणार आहे.