सावंतवाडी / प्रतिनिधी-
कळणे मायनिंग कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी दोन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही ऑक्सिजन सेट तहसीलदार म्हात्रे यांनी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा शिरोडकर यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. कळणे मायनिंग कंपनीने सामाजिक बांधिलकीतून हे दोन ऑक्सिजन सेट कोरोना रुग्णांसाठी दिले आहेत. हे दोन्ही ऑक्सिजन सेट सावंतवाडी येथील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहेत.