43 नवे तर सक्रिय रुग्ण 900 वर
बेळगाव : सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 236 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सायंकाळी जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे. चिकोडी तालुक्मयातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा सरकारी आकडा 848 वर पोहोचला आहे. एकूण बाधितांची संख्या 77 हजार 575 वर पोहोचली आहे. यापैकी 75 हजार 841 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 886 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध इस्पितळांत उपचार सुरू आहेत.
हिंडलगा, मच्छे, मार्कंडेयनगर-निंग्यानट्टी, बसवाण गल्ली, बिम्स कॅम्पस, हनुमाननगर, कामत गल्ली, लिंगराज हॉस्टेल, कणबर्गी, सदाशिवनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सोमवारी बेळगाव तालुक्मयातील 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अथणी तालुक्मयात 4, हुक्केरी तालुक्मयात चार, खानापूर, रामदुर्ग, रायबाग तालुक्मयात प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप 2,407 जणांचे अहवाल यायचे आहेत.