अव्दैत, जान्हवी देवरुखमध्ये, साक्षीचे रात्री आगमन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
देवरुखमधील अद्वेत कदम, जान्हवी शिंदे हे दोन्ही विद्यार्थी रविवारी पहाटेच्या 5व़ा सुमारास देवरुखमधील आपल्या निवासस्थानी सुखरुप पोहोचले आहे. साक्षी नरोटे आज रात्री 11 व़ा सुमारास देवरुखमध्ये परतणार आहेत़
दिल्ली येथून पुणे विमानतळावर या विद्यार्थींची रविवारी आगमन झाल़े यावेळी कृषी राज्यमंत्री व कॉग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी या विद्यार्थींचे पुणे विमानतळावर स्वागत केले व विचारपूस केल़ी यानंतर साक्षी वगळत अद्वैत व जान्हवी आप-आपल्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर देवरुखवासीयांनी देवाचे आभार मानले आहेत़ जिह्यातील 8 पैकी 8 विद्यार्थी भारतामध्ये सुखरुपे पोहोचले आहेत़ जिह्यातील युक्रेनमध्ये एकूण 8 विद्यार्थी अडकून पडले होत़े मात्र मजलदरमजल करत शेवटी हे विद्यार्थी मायदेशी परतले आहेत़
फुरूसचा वहाबिल सनगे युक्रेनमधून कुवेतमध्ये सुखरूप परतला!
खेड प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनूसार रशिया-युपेनच्या युद्धामुळे अडकून पडलेला खेड तालुक्यातील फुरूस येथील वहाबिल सईद सनगे हा विद्यार्थी कुवेतमध्ये आई-वडिलांकडे सुखरूप घरी परतला. 4 दिवस युद्धजन्य परिस्थितीत दिवस कंठणारा वहाबिल हा रोमानियाची सीमा गाठून सुखरूप घरी परतल्याने आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला. युक्रेनच्या विनिशिया नॅशनल मेडिकल विद्यापीठात पहिल्या वर्षाच्या शिक्षणाचे दोन महिने पूर्ण होत असतानाच अचानक युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी बसची व्यवस्था करण्यात आली. 8 तासांचा प्रवास करत रोमानिया देशाच्या सीमेपासून 10 किलोमीटर अंतरावर पोहचल्यानंतर तेथून पुन्हा 7 किलोमीटर पायपीट करत सीमारेषेवर पोहचला. मात्र याठिकाणी सीमारेषा पार करण्यासाठी 30 तासांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बुडापेस्ट विमानतळावरून त्याने कुवेत गाठले.