रत्नागिरी, चिपळुणात सर्वाधिक रुग्णवाढ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात मागील 24 तासामध्ये दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तब्बल 132 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ रत्नागिरी तालुक्यातील 53 वर्षीय महिला व दापोलीमधील 85 वर्षीय वृद्धाचा मृतांमध्ये समावेश आह़े जिह्यातील मृतांची संख्यात आता 380 तर रूग्णांची संख्या 11 हजार 570 झाली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 819 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 113 तर ऍन्टीजेन चाचणीत 19 से 132 कोरोना रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 31 दापोली 29, खेड 15, चिपळूण 28, संगमेश्वर 9, ,लांजा 19 व राजापुरातील 1 असे आहे. यामुळे जिह्यातील कोरोन रूग्णांची संख्या 11 हजार 570 झाली आह़े
54 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 410 पर्यंत पोहचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 89.97 आह़े जिह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता 380 व मृत्यूदर 3.28 इतका आह़े
एकूण रूग्ण -11570
नवे रूग्ण -132
मृत्यू -02
एकूण मृत्यू 380