नंदकुमार तेली/कोल्हापूर
‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कोल्हापूरच्या अर्थव संदीप गोंधळीची नोंद झाली आहे. या अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिवन देशमुख यांच्या हस्ते त्याला फास्टेस्ट व लाँगेस्ट सायकलिंग केल्याबद्द दोन प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारासह अर्थवचा एक वर्षात तब्ब्ल 23 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
फास्टेस्ट व लाँगेस्ट सायकलिंगसाठी दोन प्रमाणपत्र प्रदान
पेठ वडगांव येथील होली मदर इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी डॉ.अथर्वने क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवली आहे. सध्या तो इयत्ता 9 वी मध्ये शिकत असून अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी बजावत आहे. नुकताच त्याची ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांना हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सीईओ सुमन पल्ले यांनी दिली. याअंतर्गत त्याला 42.195 कि.मी. अंतराची मॅरेथॉन सायकलिंग 78 मिनिटे व 57 सेकंदात पूर्ण केल्याबद्दल फास्टेस्ट सायकलिंगचे प्रमाणपत्र तर 296 कि.मी. अंतराची सायकलिंग 12 तासात पूर्ण केल्याबद्दल लाँगेस्ट सायकलिंगचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अथर्वच्या यशस्वी वाटचालीत प्रशिक्षक अमोल कोरगांवकर व क्रीडा शिक्षक आर.के.कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन तर आई-वडीलांचे प्रोत्साहन मिळत आहे.
अथर्वला एका वर्षात तब्बल 23 पुरस्कार
गेल्या 2018-19 या एका वर्षात अथर्वने तब्बल 23 विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने एका वर्षात केलेल्या विक्रमांमध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश आहे. अथर्वने 12 तासात 296 कि.मी. अंतराचे सायकलींग करून (चिल्डन, नॅशनल, एशिया, पॅसिफिक व ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड) या 6 नविन विक्रमांची नोंद केली. यानंतर त्याचा एशिया इन इंडियातर्फे चेन्नई येथे त्याचा ‘डायरेक्टरेट इन ऍथलेटिक्स’ या पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र फौंडेशनतर्फे ‘बेस्ट ऍथलेटिक्स ऑफ द इअर – 2019’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर इचलकरंजीतील श्रमशक्ती एकता संघटनेतर्फे क्रीडा भूषण, रायझींग स्टार, बेस्ट ऍचिव्हर, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली आहे. तसेच अथर्वने 21 कि.मी.मॅरेथॉन, वयाच्या 12 वर्षीच तायक्वांदो ब्लॅकबेल्ट, कुडो, सायकलींग, टायथॉलॉन, आदींसह एका वर्षात वयाच्या 14 व्या वर्षात सुमारे 23 विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.स्टिव्हन अल्वारीस यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह -2020 चा अर्थवला ब्रँड ऍम्बेसिडोर म्हणून निवड केली होती.