नुकूलोफा
प्रशांत महासागराच्या व्याप्तीत येणाऱया टोंगा देशाला अलीकडेच त्सुनामीने धडक दिली असून यात आतापर्यंत 3 जण मरण पावल्याचे सांगितले जाते. पण यात एका 57 वर्षीय लिसाला फोलाऊने मात्र 27 तास पोहून आपले प्राण वाचवले, ज्याची चर्चा जागतिक सोशल मीडियावर जास्त चर्चा रंगलेली दिसली. दरम्यान या देशाला न्यूझीलँडसह इतर देशांनी तातडीने मदत साहित्याची गरज पुरवल्याचे सांगितले जाते. कॉमिक बुक सुपर हिरोनंतर आता फोलाऊ यांना रियल लाइफमधले अक्वामॅन असे संबोधले जात आहे. अपंगत्व असतानाही त्यांनी 27 तास पोहत आपला बचाव करण्यात यश मिळवले आहे. गेल्या शनिवारी येथे त्सुनामी आली होती. तीन जणांचा यात सध्या तरी मृत्यु झाल्याचे समजते. त्यानंतर आता या देशाच्या मदतीसाठी न्यूझीलँड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासह इतर देशांनी धाव घेतली आहे. शुद्ध पाण्याच्या बाटल्या व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा घेऊन विविध देशांची विमाने टोंगामध्ये दाखल झाली आहेत. आवश्यक ते सहाय्य करण्याचा याद्वारे प्रयत्न केला जात आहे.