बेळगाव
ज्ये÷ शिक्षणतज्ञ, संशोधक आणि तत्त्वचिंतक डॉ. जे. पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेणाऱया डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित चरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवार दि. 24 रोजी होणार आहे. शिवबसवनगर येथील सिद्धराम इंग्रजी मीडियम शाळेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेननस्मिथ हायस्कूलचे चेअरमन रेव्ह. जे. नंदकुमार भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. डॉ. एम. रामचंद्रगौडा उपस्थित राहणार आहेत. गदग येथील तोंटदराया संस्थानचे मठाधीश जगद्गुरु डॉ. सिद्धराम महास्वामीजी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
जयंत पांडुरंग नाईक यांनी शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत भरीव असे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर केला गेला. युनेस्को संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्या जागतिक स्तरावरील कालातीत अशा शंभर जणांची यादी प्रसिद्ध केली. त्यात भारतातून महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर यांच्या व्यतिरिक्त डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव होते. त्यांच्या कार्याची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, म्हणून डॉ. मनोहर निंबाळकर यांनी हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले आहे.