ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एका दिवसाच्या कमीनंतर मंगळवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. देशात मंगळवारी 42 हजार 625 नवीन रुग्णांची नोंद झाली. 36 हजार 668 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 562 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 9 हजारने वाढली. सध्या देशात 4.10 लाख रुग्ण उपचार घेत आहेत.
केरळ वाढवतोय चिंता
दैनंदिन रुग्णवाढीचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये दिसून येत आहे. मंगळवारी येथे 23 हजार 676 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. सोमवारी हा आकडा 13 हजार 984 होता. राज्याच्या सक्रिय रुग्णसंख्येतही 9 हजार 959 ने वाढ झाली आहे. आता येथे 1.73 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे.