प्रतिनिधी/ पणजी
आज 12 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी मिळविल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपाचाच झेंडा फडकणार आहे, असे ते म्हणाले. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींमध्ये मिळून भाजपा 41 जागांवर निवडणूक लढवत आहे. दक्षिण गोव्यातील सांकवाळ मतदारसंघातून भाजपाच्या अनिता थोरात यापुर्वीच बिनविरोध निवडून आल्याने भाजपाने खाते खोलले आहे. भाजपा आता उत्तर गोव्यातून 25 आणि दक्षिण गोव्यातील 16 मतदारसंघात निवडणूक लढवत असून दोन्ही पंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, असे ते म्हणाले.