एक भिकारी मृत्यूनंतर कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून ही घटना सर्वांनी आणि विशेष करून अधिकाऱयांनी धोक्याचा इशारा म्हणून गांभीर्याने घेण्याची गरज आहे. भीक मागणाऱया खरोखरच गरीब आणि गरजू लोकांबद्दल आपण सहानुभूती बाळगत नाही असे नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत सावध दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केले आहे. भीक मागणाऱया सर्वांना योग्य आश्रयस्थानामध्ये सोय करून देण्याची गरज आहे. यात काही प्रमाणात भीक मागण्याचा धंदा करणारे असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे त्या कोनातून तपासणी करणे आवश्यक आहे. तशा भिकाऱयांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. जुन्या बाजारात वाहतुकीच्या सिग्नलवर भिकारी अक्षरशः डोके गाडीच्या खिडक्मयांमधून आत घालतात आणि भीक मागतात. हे फार धोकादायक आहे. कारण कोविड-19 च्या बाबतीत ते किती सुरक्षित आहेत हे कोणालाही ठाऊक नाही, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले.
Previous Articleमडगावातील भिकारी, बेघर परप्रांतीय बनले धोक्याची घंटा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.