भाजप अध्यक्षांकडून ममता बॅनर्जी लक्ष्य
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे रविवारी म्हणजेच 25 एप्रिल रोजी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिकचक येथील जाहीर सभेला संबोधित केले आहे. राज्यात सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे.
बंगालचे लोक आता ममता बॅनर्जींना घाबरणार नाहीत. जनतेला आता ममतांच्या अत्याचारापासून मुक्ती हवी आहे. सातव्या आणि आठव्या टप्प्यात लोक भाजपलाच मतदान करतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोरोना संकट योग्यप्रकारे हाताळता आले नसल्याचेही नड्डा यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोनासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयोजित बैठकांमध्ये का सामील होत नाहीत? ममतांना कोण रोखत आहे? ममतांना त्यांचा अहंकार रोखत आहे का? ममतांचा अहंकार बंगालची जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामध्ये अडथळा ठरत असल्याचे उद्गार भाजप अध्यक्षांनी काढले आहेत.