वार्ताहर/ पुसेगाव
महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प पू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेली बैलगाडय़ांची शर्यत मंगळवार दि 22रोजी पुसेगाव ता खटाव लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या सहभागाने पार पडली. या शर्यतीत सुमारे 456 गाडय़ांनी सहभाग नोंदवला.खटाव तालुक्यात ब्रयाच वर्षानंतर भरलेल्या या आखडय़ाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पुसेगावच्या बैलगाडय़ांच्या शर्यती आखडय़ाला विशेष महत्त्व आहे. गेल्या दोन चार वर्षांपासून पुसेगावात बैलगाडय़ांच्या शर्यती झाल्या नव्हत्या.त्यामुळे प्रेक्षकांनी आजच्या आखडय़ाला पर
प्रचंड गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्ट चे मठाधीपती प पु सुंदरगिरी महाराज,देवस्थान ट्रस्ट चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ सुरेश जाधव, रणधीर जाधव,प्रताप जाधव,सुरेश जाधव,माजी विश्वस्त विजय जाधव, यांच्यासह गावातील ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुसेगाव बुध रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या बाजार समिती च्या गोडाऊन च्या पुढील बाजूस दरा नावाच्या शिवारात झालेल्या या शर्यतीसाठी अनुक्रमे 75 हजार रुपये,51 हजार,41 हजार,31 हजार ,21 हजार तर सहा व सातव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 11 हजार रुपयांची बक्षिसे तसेच फेयात आलेल्या प्रथम व द्वितिय क्रमांकास अनुक्रमे 300 व 200 रुपये तर सेमी फायनल ला आलेल्या दोन गाडीला अनुक्रमे 500 व 300 रुपये देण्यात आली.
श्री सेवागिरी महाराजांच्या समाधीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने पुसेगावात झालेल्या या शर्यतीत शासनाचे कोरोना विषयक सर्व नियम पाळून या बैलगाडय़ांच्या शर्यतीत अपेक्षा पेक्षा जास्त गाडीवानाने सहभाग नोंदवावा, नावलौकिक असलेल्या पुसेगावच्या आडय़ाला साजेशे वर्तन सर्वच गाडीवान मालक,चालक व सवंगडय़ानी केल्याने लाखोंच्या संख्येने उपस्थित हा अड्डा यशस्वी झाला