मालवण/प्रतिनिधी-
बारावी परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम आलेली टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी हर्षिता पांडुरंग ढोके हिचा मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य दादा वाघ, भाऊ मोरजे, राधीका कुबल, सेजल परब, दीक्षा ढोके, सल्लागार महेश जुवाटकर, सन्मेश परब आदी उपस्थित होते.