बागवाडा सिमेपाईण म्हार्दोळ येथील घटना : चार तासांच्या थरारानंतर मृत बिबटय़ा वनखात्याने पकडला.संशयास्पद मृत्यूमागील कारण अस्पष्ट
प्रतिनिधी /फोंडा
बागवाडा सिमेपाईण, म्हार्दोळ येथे काल शुक्रवाग्नग्नरी सकाळी एका घराजवळ कुत्र्याच्या पिल्लाच्या शिकारीसाठी आलेला बिबटय़ाने तब्बल चार तासांच्या थरारानंतर वनखाते व अभयारण्य टिमने जेरबंद करण्यात यश मिळवले खरे परंतू तोपर्यंत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत चौकशीचे आदेश वनखात्याने दिलेले आहे. बिबटय़ा जखमी अवस्थेत होता. त्याच्या मानेवर जखम आढळलेली असून त्यानंतर वनखात्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वापरलेल्या गुंगीच्या इंन्जेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावर ग्रामस्थांची एकच गर्दी उसळली होती.
प्राप्त माहितीनुसार बागवाडा सिमेपाईण येथे रामदास नाईक यांच्या घराजवळील ओsसरीत कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केल्यानंतर तो जखमी अवस्थेत अडकला होता. त्याने कुत्र्याच्या चार पिल्लाची शिकार केली होती. पुर्ण वाढ झालेला तो नर बिबटय़ा सुमारे 40 किलो वजनाचा होता. मागील काही दिवसापासून तो ढवळी भागात धुडगूस घालत असलेला तोच बिबटय़ा असावा असा प्राथमिक अंदाज वनखात्याने वर्तविला आहे. आठ दिवसापुर्वी शेजारीच्या एका घरातील कुत्र्याच्या पिल्लाची शिकार करण्यात आल्याची माहिती येथील पंचसदस्य पांडुरंग गावडे यांनी दिली. वारंवार वनखात्याला याची माहिती देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
सकाळी सव्वासातनंतर थरारनाटय़ाला सुरूवात
रामदास नाईक यांच्या घरात एकूण सात जण राहत असून त्यापैकी एक सात वर्षाची चिमुकलीचाही समावेश आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास देवकार्यासाठी फुले तोडण्य़ासाठी बागेत गेले असता सदर प्रकार उघडकीस आला. भिंतीच्या ओसरीला असलेल्या खोपटीत आड तो दिसला होता. बिबटय़ाने जेष्ठ नागरिकांवर डरकाळी फोडली. घाबरलेल्या अवस्थेत तो घरबंद कडी घालून राहून त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वनखात्याच्या टिमला पाचारण करण्यात आले. घटनास्थळाच्या वरच्या बाजूला डोंगराळ भाग असून मधून रस्ता ओलांडून तो घराजवळील पररिसरात दाखल झाला होता. घराशेजारी पाण्य़ाचा स्त्राsत असलेले शेती आहे. त्यानंतर वनखात्याची टिम दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. रात्री अनेकवेळा बिबटय़ा निदर्शनास पडल्याचा घटना घडलेल्या आहेत. बिबटय़ा दिसल्यानंतर घराच्या परिसरात रात्रीच्यावेळी आग पेटवून ठेवण्यात आल्याची माहिती काही नागरिकांनी दिली.
बिबटय़ाला जेरबंद केल्यानंतर वनखात्यातर्फे ढवळी फोंडा येथील वनखात्याच्या जागेत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही दिवसापुर्वी वरचवाडा-ढवळी येथील श्याम गावडे यांच्या घराच्या सभोवताली असलेल्या डोंगरावरुन आपल्या भक्ष्याच्या शोधत असाच एक बिबटय़ा रात्री 12.30 वा. सुमारास घराजवळ पोचला होता. त्यावेळी श्याम यांच्या घरात पाळलेले दोन कुत्रे असून त्यापैकी एका छोटय़ा कुत्र्याच्या पिल्लाच्या मागे हा बिबटय़ा लागला. आपला जीवा वाचवण्यासाठी केकाटत हे पिल्लू घराच्या ओसरीतून बाजूच्या खोलीत शिरला होता. त्यावेळी या कुटूंबियाचा थरकाप उडाला होता. असाच थरकाप कालच्या घटनेतही नाईक कुटूंबियानी अनुभवला आहे. बिबटय़ाचा संचार भक्ष्याच्या शोधात वस्तीकडे वळत असल्याने सद्या फोंडा व आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.