वृत्तसंस्था / नेयॉन
स्वीत्झर्लंडमधील नेयॉन या युफाच्या प्रमुख कार्यालय असलेल्या शहरामध्ये युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. शुक्रवारी या स्पर्धेचा उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचा ड्रॉ जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेतील दुसऱया टप्प्यातील शेवटच्या सोळा संघातील सामने संबंधित क्लबच्या मालकीच्या स्टेडियम्सवर खेळविले जातील. दरम्यान, या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील दोन सामने मात्र अद्याप खेळविले गेलेले नाहीत. इंटरमिलान आणि गेटाफी तसेच सेव्हिला आणि एएस रोमा यांच्यातील सामने जर्मनीत होतील.
उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ- (सामने 10-11 ऑगस्ट रोजी जर्मनीत)
पहिला सामना- वुल्फस्बर्ग किंवा शेखतार डोन्स्टेक विरुद्ध एंटेट फ्रँकफर्ट किंवा बेसिल, दुसरा सामना- मँचेस्टर युनायटेड किंवा एलएएसके विरुद्ध इस्तंबूल बेसाक सेहिर किंवा कोपेनहॅगेन, तिसरा सामना- इंटरमिलान किंवा गेटाफी विरुद्ध रेंजर्स किंवा बायर लिव्हरकुसेन, चौथा सामना- ऑलिम्पियाकोस किंवा वूल्वेहॅम्पटन वाँडरर्स विरुद्ध सेव्हिला किंवा एएस रोमा.
उपांत्य फेरीचा ड्रॉ- (सामने 16-17 ऑगस्ट रोजी जर्मनीत)
पहिला सामना – चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेता विरुद्ध दुसऱया उपांत्यपूर्व फेरीतील विजेता. दुसरा सामना- तिसऱया उपांत्यपूर्व फेरीतील विजेता विरुद्ध पहिल्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेता.