मौजेदापोली / वार्ताहर
दापोली शहरामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी झालेली गर्दी आता पूर्णत: ओसरल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिवाळी तोंडावर आल्यानंतर ग्रामीण भागासह शहरातील नागरीकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दापोली बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे कोरोनाचे संकट हद्दपारच झाले असल्याची प्रचिती येत होती. परंतु परिस्थिती तशी नसून कोरोनाचे संकट अद्यापही आहे. कोरोनाचे संकट व शासनाचे नियम असतानाही मास्कचा वापर टाळला जात होता. तर सामाजिक अंतर अशा अनेक नियमांचे पालन केले जात नव्हते. परंतु दिवाळीच्या काही दिवसानंतर मात्र दापोली शहरातील गर्दी ओसरत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दापोली शहरामध्ये सकाळी 10 नंतर बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांची गर्दी होते. परंतु काही दिवस मात्र दापोली बाजारपेठ शांत झाली असल्याचे दिसून येत आहे. दापोलीतील पर्यटनस्थळातील गर्दी वाढत आहेत. परंतु असे असले तरी शहरातील बाजारपेठेतील गर्दी ओसरली आहे.