वार्ताहर /कणकुंबी
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेंगळूर यांच्यावतीने बेळगावात डिसेंबरमध्ये राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन भरविण्याचा निर्णय आज सोमवार दि. 29 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बेळगाव येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या सभागृहात बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष व शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर होते. यावेळी क्रीडा भारती प्रमुख व संघटक अशोक शिंत्रे व कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य प्रधान कार्यदर्शी चिदानंद पाटील होते.
बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी उमेश कुलकर्णी यांने स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर आणि राज्य प्रधान कार्यदर्शी चिदानंद पाटील यांनी राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन आयोजित करण्याचा हेतू सांगून, केव्हा आणि कुठे घेण्यात यावे, याबद्दल चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बेळगाव येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या पटांगणात दि. 22 डिसेंबर रोजी राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन भरविण्यात यावे, असा एकमुखी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा घटक संघाचे उपाध्यक्ष विश्वजीत हसबे तसेच सहप्रधान कार्यदर्शी वामन कुलकर्णी तसेच महिला प्रमुख नवीना शेट्टीगार, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम कुडतूरकर, पी. सी. जोशी बी. के. मॉडेल हायस्कूल, एम. बी. अंगडी बेननस्मिथ हायस्कूल, सुरेश कळ्ळेकर विज्ञान विकास हायस्कूल, डी. एस. तारीहाळकर पी. यू. कॉलेज, खानापूर तालुका घटक अध्यक्ष सुनील चिगुळकर कणकुंबी हायस्कूल, कार्यदर्शी अनिल कदम करंबळ हायस्कूल, कार्याध्यक्ष एन. डी. पाटील लोंढा हायस्कूल, पी. ए. पाटील कारलगा, जे. एम. पाटील मणतुर्गा हायस्कूल, एस. एस. कोष्टी ठळकवाडी हायस्कूल, आर. पी. वंटगुडी सरकारी हायस्कूल, श्रीमती एस. बी. देसाई उषाताई गोगटे हायस्कूल, श्रीमती रोहिणी नाईक व श्रीमती शैला चाटे व इतर सदस्य उपस्थित होते. एल. बी. नायक यांनी आभार मानले. पुढील बैठक येत्या शुक्रवारी 4 वाजता घेण्याचे ठरविण्यात आले.