पणजी / स.प.
कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी बांबोळी येथील गोमेकॉत करण्यात आली असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉ डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या समवेत एकंदरित तयारीची पाहणी केली आणि माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना लस देणार असून प्रथम त्यांना काही लक्षणे आहेत काय? याची तपासणी होणार आहे. त्यानंतर नोंदणी करुन त्यांना लस देण्यात येणार आहे. लस देण्यात आल्यानंतर काहीतरी परिणाम झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी वेगळी रुम आरक्षित ठेवण्यात आली आहे.
गोवा राज्याला कोविडच्या 23500 लसी प्राप्त झालेल्या आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय-बांबोळी, उत्तर गोवा जिल्हा इस्पितöम्हापसा, हॉस्पिसियो इस्पितळ-मडगाव, उप जिल्हा इस्पितळ-फोंडा, उप जिल्हा इस्पितळ-चिखली, आणि दोन खासगी इस्पितळे मणिपाल इस्पितळ-दोना पावला आणि हेल्थ वे इस्पितळ, ओल्ड गोवा येथे आज पहिल्या दिवशी 100 आरोग्य कर्मचाऱयांना कोव्हिशिल्ड लसी देण्यात येतील.