पोलीस तक्रार, एफआयआरपासून वाचण्यासाठी देवाकडे प्रार्थना
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मागील वर्षी अनेक वादांमध्ये सापडली. तिच्यावर टीका देखील झाली, वादग्रस्त टिप्पणींमुळे ट्विटरकडू तिच्यावर बंदी घालण्यात आली. अशा स्थितीत अभिनेत्रीने नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली आहे. तिरुपति बालाजीनजीक निर्माण ‘राहु-केतू’ मंदिरात तिने पूजा केली आहे. एफआयआर अणि पोलीस तक्रारींपासून वाचण्यासाठी तिने देवाकडे प्रार्थना केली आहे. अधिकाधिक प्रेमपत्रे मिळावीत अशी कामना केली आहे.
क्रीम कलरमधील साध्या साडीत आणि कपाळावर टिळा लावलेली कंगना मंदिरात भक्तीत लीन दिसून आली. तिने दीपांदरम्यान बसून पूजा केली तसेच गायींना चारा वाहिला आहे. जगातील एकमेव ‘राहु-केतू’ मंदिर, हे तिरुपती बालाजीच्या अत्यंत समीप आहे. तेथे काही विधी केले. ही अत्यंत अद्भूत जागा आहे. यंदा मी कमीत कमी पोलीस तक्रारी आणि एफआयआर इच्छिते असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. कंगनाने याचबरोबर स्वतःचे एक छायाचित्र शेअर करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगना सध्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट ‘टीकू वेड्स शेरू’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे अलिकडेच शेअर केली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर देखील दिसून येणार आहे.