बेळगाव : लोकमान्य ग्रंथालय प्रणित अक्षरछाया दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला. मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर व बुलकचे अध्यक्ष निखिल नरगुंदकर यांच्या हस्ते बुलकच्या अक्षरछाया दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याचवेळी सदस्यांसाठीच्या दिवाळी अंक योजनेचा आरंभ करण्यात आला. शोभा लोकूर यांनी अक्षरछाया अंकाला व दिवाळी अंक योजनेला शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल रंजना कारेकर यांनी ग्रंथालयाच्या आजवरच्या दिवाळी अंकाच्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी कार्याध्यक्ष अशोक याळगी, किशोर रेडकर, बुलकचे सदस्य उपस्थित होते.
Previous Articleआयएमएतर्फे धन्वंतरी पूजन कार्यक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.