ढिगाऱयाखाली अडकून तिघांचा मृत्यू : 3 बचावले
वृत्तसंस्था/ वडोदरा
गुजरातच्या वडोदरा येथील बावनपुरा येथे सोमवारी रात्री उशिरा एक चारमजली इमारत कोसळल्याने एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला आहे. एका मुलासह 3 जणांना वाचविण्यास आतापर्यंत प्रशासनाला यश आले आहे. अद्याप 3 जण ढिगाऱयाखाली अडकून पडल्याचा अनुमान व्यक्त होत आहे. प्रशासनाने बचावमोहिमेला वेग दिला आहे. संबंधित इमारत सुमारे 30 वर्षे जुनी होती आणि याची दुरुस्ती करण्यात येत होती.
दुर्घटनेतील बहुतांश पीडित मजूर होते आणि दुर्घटनेवेळी ते इमारतीत झोपले होते. या दुर्घटनेत इमारतीचा मालकही जखमी झाला आहे. जखमींना शहराच्या एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही इमारत बऱयाच दिवसांपूर्वी एका दिशेला झुकली होती. प्रशासनाला अनेकदा याची कल्पना स्थानिकांकडून देण्यात आली होती. परंतु याकडे लक्ष देण्यात आले नव्हते.