राजस्थानात नवऱया मुलीच्या स्वप्नाची झाली पूर्ती
राजस्थानच्या भरतपूर येथून अनोखी घटना समोर आली आहे. येथील वधूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजित वर विवाहासाठी हेलिकॉप्टरने पोहोचला आहे. विवाहानंतर याचे हेलिकॉप्टरने तो वधूसह परतला आहे. या विशेष विवाहाला अनुभवण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
नदबई तालुक्यातील करीली गावातील ही घटना आहे. येथील वधू रमाचा विवाह रायपूर येथील सियारामसोबत निश्चित झाला होता. मंगळवारी दोघांचाही विवाह धुमधडाक्यात पार पडला आहे.
होणाऱया वधूने स्वतःच्या नियोजित पतीकडे विवाहानंतर सासरी हेलिकॉप्टरने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्वतःच्या पत्नीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पती सियारामने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. विवाहानंतर वधूला करीली गावातून हेलिकॉप्टरनेच स्वतःच्या गावी नेले आहे.
सियाराम हा पोस्ट विभागात कर्मचारी आहे. वधूने हेलिकॉप्टरने सासरी जाण्याच इच्छा व्यक्त केली असता पतीनेही त्याचा सन्मान करत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. हेलिकॉप्टरच्या व्यवस्थेकरता सुमारे 4 लाख रुपयांचा खर्च आल्याचे समजते.