कुडाळ पोलिसांची 25 जणांवर दंडात्मक कारवाई
वार्ताहर / कुडाळ:
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली असताना कुडाळ शहरात विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांना कुडाळ पोलिसांनी मंगळवारीही दुपारी दणका दिला. 25 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत 6,300 रु. चा दंड वसूल केला. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू केले आहेत. कुडाळ तालुक्मयासह संपूर्ण जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्मयात आणण्यासाठी राज्य शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन अंमलबजावणी करीत आहे. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत नाही. दुकाने बंद झाल्यानंतरही शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ बऱयापैकी सुरू असते.
शासनाचे नियम पाळले जावेत, म्हणून पोलीस निरीक्षक कोरे यांनी विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांवर कारवाई करून ही वर्दळ कमी होण्यासाठी सलग दोन दिवस येथील पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर अचानक ही मोहीम राबविली. मंगळवारी दुपारी दुकाने बंद झाली असतानाही वर्दळ असल्याने कोरे यांनी आपल्या सहकाऱयांसह रस्त्यावर उतरुन वाहने थांबवून ताब्यात घेतली. नंतर त्या वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली. यात 25 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत कोरे यांच्यासह उपनिरीक्षक सागर शिंदे, हवालदार एस. एन. टाकेकर, एन. यू. हिप्परकर, वाहतूक पोलीस एकनाथ सरमळकर व संभाजी पाटील तसेच होमगार्ड सहभागी झाले होते.