एस. एस. धुपदाळ यांचे प्रतिपादन : हालट्टी सरकारी शाळेत सत्कार समारंभ
प्रतिनिधी/ चिकोडी
शिक्षकांना सरकारच्या सर्व सुविधा मिळवून देण्यासह शिक्षकांच्या समस्या निवारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे मत चिकोडी तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. धुपदाळ यांनी व्यक्त केले. शहरातील हालट्टी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.
धुपदाळ पुढे म्हणाले, शिक्षकांना बढती व पगारी रजा मिळवून देण्यासह शिक्षक सामोरे जात असलेल्या अनेक समस्यांचे निवारण करणे आवश्यक आहे. सदर समस्यांबाबत अधिकाऱयांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य सरकारी नोकर संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या एस. एन. बेळगावी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जी. एम. कांबळे, एन. जी. पाटील, एस. ए. खड्ड, एस. एस. येडूरकर, गामा कट्टी, लता कांबळे, पुष्पा कांबळे, व्ही. आर. ढाले, बी. एल. निलवंगीमठ, पी. बी. होसमनी, आर एम. गौडर उपस्थित होते.