वार्ताहर /माशेल
प्रियोळ मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उद्योजक संदीप निगळय़े माशेल येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कामत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संदीप निगळय़े, दत्ता फडते गावकर, गजानन प्रभूगावकर, कृष्णानंद गावकर, महेश शिलकर, प्रकाश वळवईकर, मंगलदास प्रियोळकर, प्राची वायंगणकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप निगळय़े म्हणाले, मागील महिनाभर प्रियोळ मतदारसंघात घरघर चलो अभियान सुरु असून त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेताना प्रियोळ मतदार संघातील विविध समस्या लोकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली तरी अजूनही बऱयाच नागरिकांपर्यंत प्राथमिक सुविधा पोचलेल्या नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहणार आहे. आपल्या या घरघर चलो अभियानात शंभरहून अधिक कार्यकर्ते स्वच्छेने सहभागी झाले आहेत. काही विरोधकांकडून आपण निवडणुकीतून माघार घेतल्याच्या अफवा समाज माध्यमांवरुन पसरविल्या जात आहेत. विरोधकांनी आपल्याला मिळणाऱया वाढत्या प्रतिसादाचा धसका घेतल्याचे त्यातून सिद्ध होत आहे. प्रियोळातील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन संदीप निगळय़े यांनी केले आहे.