26 मार्चपासून लागणार बोली
जगातील अत्यंत सुंदर आणि सर्वात मोठय़ा खासगी बेटाचा लिलाव होणार आहे. हे बेट बहामास येथे असून सेंट एन्ड्रू असे याचे नाव आहे. तसेच याला लिट्ल रॅग्ड बेटही म्हटले जाते. हे बेट 730 एकरमध्ये फैलावलेले आहे.
हे बेट अद्याप अविकसित असून नैसर्गिक स्वरुपामुळे याचे सौंदर्य खुलून दिसते. या बेटावर खासगी विमानांच्या लँडिंगसाठी धावपट्टी देखील आहे. कॉनसिर्ज ऑक्शन्सनुसार बेट खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची सर्वात कमी किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, पण लिस्ट प्राइस 142.3 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. बेटाच्या लिलावासाठी 26 मार्चपासून बोली लावली जाऊ शकते. बोली लावण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून 73 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत.
लिस्टिंग एजंटद्वारे बेटाचा लिलाव होत असून याच्या मालकासंबंधी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. बेटावर गोडय़ा पाण्यासाठी अनेक तलाव उपलब्ध आहेत. जलक्रीडाप्रकारांसाठीही या बेटाला ओळखण्यात येते.
बेटाचा खरेदीदार येथे स्वतःचे वैयक्तिक घर उभारू शकतो तसेच विकासाची अन्य कामे करण्याचे स्वातंत्र्य त्याला असणार आहे. बेटाच्या काही भागांमध्ये जंगल आणि नारळांची मोठय़ा संख्येत झाडे आहेत. क्यूबापासून हे बेट सुमारे 223 किलोमीटर अंतरावर आहे.
4 लाखांमध्ये स्माइलीयुक्त अजगराची विक्री
अजगराच्या त्वचेवर जर स्माइली दिसून आली तर तुम्हाला कसे वाटेल. पण हे घडले आहे एका दुर्घटनेमुळे. एका व्यक्तीने चुकून अजगराची अशी ब्रीडिंग करविली आहे, अंडय़ामधून बाहेर पडलेल्या अजगराच्या त्वचेवर पिवळय़ा-निळय़ा रंगाची स्माइली फेस तयार झालेली होती.
अमेरिकेच्या जॉर्जियाचे रहिवासी स्नेक ब्रीडर जस्टिन कोबिल्का यांनी हा अजगर तयार केला आहे. जस्टिन यांनी चुकून लॅवेंडर अल्बीनो पाईबाल्ड बॉल पाइथनचा जन्म घडवून आणला आहे. जस्टिन कोबिल्का मागील 19 वर्षांपासून अजगरांचे ब्रीडिंग करवून आणत आहेत.
जन्माला आलेला अजगर पिवळय़ा आणि पांढऱया रंगाचा असावा असा जस्टिन यांचा प्रयत्न होता. पण जन्मलेल्या अजगराच्या त्वचेवर पिवळय़ा रंगाची तीन हास्यमुद्रेतील स्माइली इमोजी तयार झालेली होती. एक रेसेसिव्ह म्युटेनशमुळे अजगराच्या त्वचेवर हा पॅटर्न दिसून आल्याचे जस्टिन यांनी सांगितले आहे.
दर 20 प्राण्यांपैकी एकामध्ये असे स्माइली फेस दिसून येतात. पण माझ्या 19 वर्षांच्या सापांच्या ब्रीडिंगच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या अजगराच्या त्वचेवर तीन स्माइली फेस आढळले असल्याचे जस्टिन यांनी म्हटले आहे. जस्टिन यांनी हा अजगर 6 हजार डॉलर्स म्हणजेच 4.37 लाख रुपयांमध्ये विकला आहे.