शेतकरी युवराज लोहार यांची माहिती, राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक
वार्ताहर / सलगरे
संपूर्ण महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रूट पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना संघटीत करून त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि जास्तीत जास्त बाजार भाव कसा मिळवून देता येईल, याकरिता महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्याचे ठरले असून, यासंदर्भात नुकतीच एक ऑनलाइन बैठक पार पडल्याची माहिती खटाव (ता. मिरज) येथील ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकरी युवराज लोहार यानी सांगितली.
देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे अलीकडील पाच-सहा वर्षात महाराष्ट्रात सुध्दा ड्रॅगन फ्रुटची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. परिणामी बाजारात या फळाची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. परिणामी सुरूवातीला मिळणारा दर न मिळता व्यापारी आणि दलाल यांचे या फळाच्या विक्रीवर वर्चस्व निर्माण होऊ लागले आहे.