कराड / प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक मिळवला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाले. मुंबई येथे कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे देशात प्रथम क्रमांकावर असून सासवड दुसऱ्या क्रमांकावर तर लोणावळा नगरपरिषद तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात इंदूर (मध्य प्रदेश) महापालिकेने सलग चौथ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवला. सुरत (गुजरात) या शहराने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.